Take a fresh look at your lifestyle.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टी मदत करतील! 

जाणून घ्या, घरगुती उपचार.

जर तुम्हाला सतत थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झालेले असू शकते. यावर सोपे आणि घरगुती उपाय आज पाहूयात…
● नियमित एक बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
● तुमच्या रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

● ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या.
● दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्या. किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध टाका.
● थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या रसामध्ये एकत्र करून दररोज प्या.
● एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप प्या.
● रात्रीच्या जेवण झाल्यावर शक्य असल्यास शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खा.

● रात्री झोपताना काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दूध प्या.
● टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. आहारात ते असू द्या.
● हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे भाजून किंवा उकडून खा.