Take a fresh look at your lifestyle.

राजसाहेब ठाकरे ‘कृष्णकुंज’ सोडणार !

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा, मातोश्री आणि सिल्वर ओकचं जे स्थान आहे, तेच महत्त्व कृष्ण कुंजचं आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांपासून ते कलाकार, सेलिब्रिटी, सर्वसामान्य मोठ्या अपेक्षेने कृष्ण कुंजवर येतात. या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही, असा त्यांना विश्वास असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कृष्ण कुंजचं एक वेगळं स्थान निर्माण झाले आहे. कृष्ण कुंज हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे निवासस्थान आहे. राज ठाकरे माहित असणाऱ्यांना कृष्ण कुंज कुठे आहे, हे ठाऊक नाही, असे होणार नाही. याच कृष्ण कुंज मधून राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून ते शिवसेना सोडण्यापर्यंतचे राजकीय कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
हेच कृष्ण कुंज निवासस्थान राज ठाकरे उद्या सोडणार आहेत. कृष्ण कुंजमधला त्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे. कृष्ण कुंज सोडणार, मग राज ठाकरे कुठे जाणार? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. राज ठाकरे कृष्ण कुंज सोडणार असले, तरी ते शिवाजी पार्कमध्येच राहणार आहेत.