Take a fresh look at your lifestyle.

दिवाळी फराळ करताय? मग ‘या’ गोष्टी टाळाच!

 

दिवाळी आणि फराळ यांचं एक वेगळेचं नातं आहे. त्यामुळे सर्वांना याचं विशेष आकर्षक असतं. मात्र फराळ करताना आपल्याकडून आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या काही चूका होत असतात. या टाळण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी नक्की मदत करतील…
● चकल्या किंवा इतर पदार्थ तळल्यानंतर वर्तमानपत्राचा वापर टाळा. कारण वर्तमानपत्राच्या शाईमध्ये घातक घटक असतात. ते शोषल्यास शरीरात जाऊन हानिकारक ठरू शकते. अशात वर्तमानपत्राऐवजी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता.
● चिवड्यामध्ये खूप तेल, खोबरं, शेंगदाणे टाळा. तर त्यांच्याऐवजी भाजलेल्या सुकामेव्याचा वापर करा.
● शंकरपाळी करताना साखरेऐवजी गूळ वापरा. यामुळे चवही सुधारायला मदत होईल.

● करंज्याची पारी बनवताना मैदा वापरण्याऐवजी मल्टी ग्रेन पीठ वापरा. बेसनाचा त्रास होत असेल तर रवा आणि सुकामेवा वापरा.
● चकली, शेव तळल्याने त्यामध्ये खूप तेल शोषले जाते. त्याऐवजी बेक्ड शेव आणि बेक्ड चकलीचा पर्याय निवडा, फायदा होईल.
● फराळ बनवताना एकाच दिवशी सर्व पदार्थ बनवण्याची घाई करू नका. सतत तळण्याचे पदार्थ किंवा तेलासमोर बसल्यास इतर त्रास डोके वर काढू शकतो.