Take a fresh look at your lifestyle.

आज लक्ष्मीपूजन; शुभ मुहूर्त आहे तरी काय? 

आवश्यक पुजा साहित्य कोणते ?जाणून घ्या!

 

दिवाळी सणाचा खरा आनंद लक्ष्मीपूजनाने द्विगुणित होतो. लक्ष्मीपूजनाच्या अगोदर कलश, गणेश, विष्णू, इंद्र, कुबेर आणि देवी सरस्वती यांची पूजा करण्याची परंपरा आहे. आज लक्ष्मीपूजन असल्याने पूजनाचा शुभ मुहूर्त काय? आवश्यक पूजा साहित्य कोणते? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

आवश्यक साहित्य : देवी आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती किंवा तसबिरीसह हळद-कुंकू, अक्षता, विड्याचे पान, सुपारी, श्रीफळ, लवंग, वेलची, धूप, कापूर, अगरबत्ती, दीपक, कापूस, धागा, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर), गंगाजल, गुळ, धने, ऋतुकालोद्भव फळे, फुले, जव, गहू, दूर्वा, चंदर, शेंदूर, सुकामेवा, लाह्या, बत्तासे, यज्ञोपवीत, वस्त्र, अत्तर, चौरंग, कलश, कमल पुष्प माला, शंख, आसन, पूजाथाळी, चांदीची नाणी, आंब्याची डहाळी, नैवेद्य.

असे आहेत लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त :
ऑफिस :
● सकाळी – 11:20 ते दुपारी 01:07 पर्यंत
● दुपारी – 02:50 ते संध्याकाळी 04:20 पर्यंत
दुकान :
● दुपारी – 02:50 ते संध्याकाळी 04:20 पर्यंत
● संध्या – 05:34 ते रात्री 08:10 पर्यंत
फॅक्ट्री :
● सकाळी – 09:00 ते 11:19 पर्यंत
● रात्री – 11:40 ते 12:31 पर्यंत
घर :
● दुपारी – 02:50 ते संध्याकाळी 04:20 पर्यंत
● संध्या – 05:34 ते रात्री 08:10 पर्यंत
● रात्री – 11:40 ते 12:31 पर्यंत

लक्ष्मीपूजनाचे नियम काय आहेत? :
● पूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नका.
● लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करू नका.
● लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करा.
● लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा नेहमी हसमुख स्वरुपाची असायला हवी.
● दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना करा.
● पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करा.