Take a fresh look at your lifestyle.

📌 12 राशींचे राशिभविष्य

🔸4 नोव्हेंबर 2021 

▪️मेष : आज आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. छोटे प्रवास घडतील. आरोग्याची काळजी घ्या.  
▪️वृषभ : जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. मन स्थिर ठेवा.
▪️मिथुन : नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. तुमचे कौशल्य पणाला लावा.
▪️कर्क : टीकेकडे दुर्लक्ष करावे. कौटुंबिक समाधान लाभेल. घरासाठी काही खरेदी कराल. आत्ममग्न राहाल.
▪️सिंह : कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतीचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
▪️कन्या : मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. डोक्यावरचा ताण हलका होईल.
▪️तूळ : कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. व्यवहार करताना सावध रहा. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन जपून चालवा.
▪️वृश्चिक : आज नकारात्मक विचार दूर ठेवावेत. प्रलोभनापासून दूर रहा. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका.
▪️धनु : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. आज नवीन चैतन्य जाणवेल.
▪️मकर : आज विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. गरज ओळखून पैसे खर्च कराल.
▪️कुंभ : धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. घरी पाहुणे येतील. वाहन खरेदीच्या योजना आखाल.
▪️मीन : जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.