Take a fresh look at your lifestyle.

प्रा.डॉ.संदीप गाडेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान !

शिक्षकदिनी झाला गौरव.

 

 

पारनेर : लोणी हवेली येथील रहिवाशी व वडगाव मावळ येथे सहाय्यक प्राध्यापकपदावर 14 वर्षांपासून कार्यरत असणारे डॉ. संदीप दिगंबर गाडेकर यांना शिक्षक दिनी पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्काराचे वितरण डॉ.एम.जी.ताकवले माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व उपस्थित मान्यवर प्रा. हनुमंतराव भोसले, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सौ.संध्या गायकवाड, राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी.के.थोरात, शरदचंद्र धारूरकर ,के.एस. ढोमसे, प्राचार्य शिवाजीराव कामठे , सचिन दुर्गाडे, जितेंद्र देवकर,संतोष थोरात कार्यवाह पुणे शहर टीडीएफ यांच्या उपस्थित झाले.

प्रा.डॉ.संदीप गाडेकर यांनीमहाविद्यालयात आत्तापर्यंत विविध कामांमध्ये आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली असून त्यांची आत्तापर्यंत 12 पुस्तके प्रकाशित झाली असून 20 शोध निबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने हा गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लोणी हवेली येथील सरपंच सौ.जान्हवी बाजीराव दुधाडे, विद्यमान ग्रामपंचायत सद्स्य शिवाजीराव थोरे, शत्रुघन नवघणे, अशोक कोल्हे, माजी सरपंच लहू आण्णा कोल्हे, सुभाष दुधाडे, माजी ग्रामपंचायत सद्स्य हरिभाऊ जाधव, संभाजी थोरे, बीडीओ पांडुरंग कोल्हे, पिआय विश्वजित जगताप,त्रिंबक दुधाडे, दिलीप कोल्हे, जयसिंग कोल्हे, युवराज जगताप , प्रा.डॉ.ज्ञानदेव कोल्हे, प्रा.संजय दुधाडे, किसन दुधाडे गुरुजी, बाजीराव दुधाडे, शंभू दुधाडे गुरुजी, संजय दुधाडे गुरुजी, शरद कोल्हे, सुधाकर कोल्हे, निलेश जगताप, बाबा दाते, इंजि.संदीप दुधाडे, शरदचंद्र जगताप, चंद्रकांत कोल्हे, सुभेदार विठ्ठल कोल्हे, दादा ठणगे, यार्कर दुधाडे, निलेश वाखारे , सागर हिंगडे व सर्व लोणी हवेली ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.