इंदोरीकर महाराजांचे मोठे विधान.. मी लसं बिस घेतली नाही घेणारही नाही !
नाशिक : राज्य आणि केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे वारंवार आवाहन करण्यात येतेय परंतु, प्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी कोरोना लसीबाबत एक अजबच वक्तव्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले आहे.
लोकनेते गोपाळरावजी गोडवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मी दिवसभर फिरतो, काय होईन, मी लस बिस घेतली नाही आणि घेणार पण नाही, असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले आहे. काय होतच नाही तर घेऊन करायच काय?,असा प्रश्न त्यांनी कीर्तनात केला आहे. कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असा सल्ला इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनात दिला आहे. वारकऱ्यांनी जरा जाग्यावर या, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.