Take a fresh look at your lifestyle.

खरचं !’या’ गावात मिळतोय ‘फुकट’ प्लॉट !

जाणून घ्या,काय आहे स्किम !

 

ऑस्ट्रेलियातील ‘क्विल्पी’ निसर्गानं वेढलेल्या अत्यंत सुंदर या गावात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या गावाची लोकसंख्या जेमेतेम ८०० एवढी आहे. अतिशय कमी लोकसंख्येमुळे येथील लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय.

जसे कि, डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, मेकॅनिक, व्यापारी या सारख्या अनेक व्यावसायिकांची इथे कमतरता आहे. म्हणूनच गावकऱ्यांची आणि व्यावसायिकांची संख्या वाढावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रशासन विविध प्रयत्न करीत आहे. असे असले तरी त्यांना यश आलं नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक अभिनव योजना जाहीर केली. ज्या कोणाला येथे राहायला यायचं असेल, त्याला मोफत जमीन मिळेल!
ही भन्नाट कल्पना सिटी काऊन्सिलचे प्रमुख जस्टीन हँकॉक यांच्या डोक्यातून निघाली. त्यांना वाटलं होतं, या स्कीममुळे किमान पाच कुटुंबं जरी इथे राहायला आली, तरी चालेल. ही योजना जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिया, इंटरनेटवरही ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
पुढे भारत, ब्रिटन, हाँगकाँग, न्यूझीलंड, युरोप आदी देशांतूनही लोकांनी या ठिकाणी घर बांधण्यास उत्सुकता दाखवली गेली. केवळ आठवडाभरातच देश-विदेशातील तब्बल ३५० पेक्षा जास्त लोकांनी क्विल्पीत राहायची तयारी दाखवली.
मात्र या योजनेच्या दोनच प्रमुख अटी आहेत. क्विल्पी येथे घर बांधल्यानंतर त्या व्यक्तीनं किमान सहा महिने तरी तिथे राहिलं पाहिजे. ती व्यक्ती ऑस्ट्रेलियाची नागरिक असली पाहिजे. ज्या व्यक्तीला येथे राहायला यायचं असेल, त्या व्यक्तीला फक्त सुरुवातीला १२,५०० डॉलर भरावे लागतील. सहा महिने ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय जर तिथे राहिले तर ‘डिपॉझिट’ म्हणून घेतलेली सर्व रक्कम त्यांना परत मिळेल.

क्विल्पी गावात एकच त्रुटी आहे. ती म्हणजे गावाचं तापमान उन्हाळ्यात काहीवेळा ११३ डिग्री फॅरनहिटपर्यंत जातं. पण येथील निसर्गसौंदर्य अतिशय विलोभनीय आहे. कांगारुंसारखे प्राणी तर अगदी शाळेच्या प्रांगणात खेळताना दिसतात. सिटी काऊन्सिलनं येथे राहायला येणाऱ्यांना स्विमंग पूलमध्ये फ्री प्रवेश, २४ तासात केव्हाही जाता येऊ शकेल अशी जिम, दोन ग्रोसरी स्टोअर्स, तलावाची उपलब्धता. यासह अनेक सुविधा देऊ केल्या आहेत.