7.1 C
New York
Saturday, February 24, 2024

Buy now

राष्ट्रवादी अजितदादांचीच ! पवार साहेबांना मोठा धक्का

मुंबई : निवडणूक आयोगाने जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे घडयाळ चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने लागला असून हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जातेय. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झाले आहे.

ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असे चित्र दिसतेय.

▪️शिंदे गटाचा न्याय अजितदादांच्या राष्ट्रवादीला

राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचे असल्याचे सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केले.

शरद पवार गट घेणार ‘हे’ चिन्ह ? पुन्हा ताकदीने मैदानात उतरणार

शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला होता.

Related Articles

ताज्या बातम्या