Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸3 नोव्हेंबर 2021 

 

▪️मेष : समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते. छोटे प्रवास घडतील. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल.
▪️वृषभ : घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल. नवीन करार पूर्णत्वास जाईल. अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
▪️मिथुन : निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. घरात शिस्त बाळगाल. महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
▪️कर्क : नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. तुमचे कौशल्य पणाला लावा.
▪️सिंह : आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. आपल्याला आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल.
▪️कन्या : समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका.
▪️तूळ : आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल.
▪️वृश्चिक : जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.
▪️धनु : व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा.
▪️मकर : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका.
▪️कुंभ : तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका.
▪️मीन : आज नोकरदारांना दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.