Take a fresh look at your lifestyle.

सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार !

ग्रामविकासाच्या कार्याचा झाला सन्मान.

पारनेर : तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हसोबा झापचे उपक्रमशील सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सर्च मराठी मीडिया ग्रुप कडून प्रदान करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची सगळ्यात महत्त्वाची फळी मानली जाते ती म्हणजे ग्रामपंचायत.अशाच ग्रामपंचायतीचा प्रमुख आणि गावचा आद्य नागरिक म्हणून शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे, महिला सक्षमीकरण, शिक्षण, वृक्षारोपण, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे, कोरोनाच्या काळातील खबरदारीच्या दृष्टीने केलेली कार्य, गावासाठी केलेल्या अशा विविध प्रकारच्या कामा साठी गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचा सर्च मराठी फौंडेशन आणि मिडिया ग्रुप कडून सन्मान करण्यात येतो. दरम्यान सर्च मराठी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार पारनेर तालुक्यातील म्हसोबा झापचे उपक्रमशील सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना प्रदान करण्यात आला आहे.
प्रकाश गाजरे यांना आपल्या कामांमुळे आपण फक्त सरपंच न राहता एक आदर्श सरपंच म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहात म्हणून तुमच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपणांस हे ‘सन्मानपत्र’ देण्यात येत आहे असे सर्च मराठी फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.
सरपंच प्रकाश गाजरे यांनी म्हसोबा झाप ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना अनेक उपक्रम ग्रामस्तरावर राबविले आहेत. ग्रामीण भागात उपक्रम राबवून ते आदर्श सरपंच बनले असून त्यांचा सर्च मराठी फाउंडेशन कडून करण्यात आलेला गौरव हा त्यांच्या कामाची उंची आणखीन वाढविणारा आहे. सर्च मराठी फाउंडेशन व मिडिया ग्रुपच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सरपंच प्रकाश गाजरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सर्च मराठी फाउंडेशन व मीडिया ग्रुपचे स्वप्निल सं. वजार्डे (कार्यकारी संपादक) अॅड. शाल्वी अ. शहा (एम.डी.), विष्णू ना. वजार्डे (डायरेक्टर, एडिटर इन चिफ) व प्रकाश खोडदे विकास गिरी हे उपस्थित होते. यावेळी आमदार लंके यांनी सरपंच प्रकाश गाजरे यांना शुभेच्छा दिल्या.
म्हसोबा झाप सारख्या आदिवासी भागात काम करत असताना शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून व आपल्या गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून सरपंच प्रकाश गाजरे हे उत्तम कार्य करत आहेत सरपंच गाजरे यांच्या माध्यमातून आज अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले जात आहेत.
आमदार निलेश लंके
विधानसभा सदस्य