Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸2 नोव्हेंबर 2021 

 

▪️मेष : काही धार्मिक विधींनी मनाला शांती मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल.
▪️वृषभ : आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल.
▪️मिथुन : घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. जुनी उधारी वसूल होईल.
▪️कर्क : नवीन कामासाठी चांगला वेळ आहे. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. मानसिक चंचलता जाणवेल.
▪️सिंह : प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल.
▪️कन्या : घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल.
▪️तूळ : मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.
▪️वृश्चिक : गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. अचानक धनलाभ संभवतो.
▪️धनु : स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका.
▪️मकर : चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा.
▪️कुंभ : समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या.
▪️मीन : नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल.