Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात..“ठरल्याप्रमाणे झालं असतं तर…? ”

मुंबई : आर्यन खान प्रकरणावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवत गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे ‘मास्टर माइंड’ आहेत, असा आरोप देखील मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला होता. 
यावर आता या आरोपांची चौकशी करा, असे आव्हान फडणवीस यांनी मलिकांना दिले.तसेच, पुढे फडणवीस म्हणाले, “जर एखाद्या व्यक्तीसोबत फोटो काढल्याने ड्रग कनेक्शन जोडले जात असेल तर नवाब मलिक यांचे जावई ड्रग्जसकट सापडले. मग मलिकांचा रेश्यो लावायचा झाला तर पूर्ण एनसीपी ड्रग्ज माफिया असले पाहिजेत.
मलिकांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी आज फोटोग्राफी करत असलो असतो आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने शब्द पाळला नाही, असा सातत्याने आरोप केलेला दिसत आहे.दरम्यान, मंत्रालयात वाॅर रूम होती, मी म्हटलं रूम आहे पण वाॅर नक्की कुणाशी करायचं? मग मी रूमचं नाव बदलून संकल्प कक्ष केलं असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काहीजण म्हणतात दिवाळीनंतर बाॅम्ब फोडेन, मी पाकिस्तानात कधी बाॅम्ब फुटतात याची वाट बघतोय, असं ,सुचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.