Take a fresh look at your lifestyle.

आ. निलेश लंके,आ.रोहित पवार यांच्यावर ‘साकळाई’चे पाणी पळविणार असल्याचा आरोप !

राजकीय नेत्यांनी 'साकळाई'चे निवडणूकांपुरतेच भांडवल केले !

 

नगर : साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी राजकारण केले.निवडणूक आली की साकळाई प्रश्नांबाबत बोलतात ,आश्वासन देतात आणि निवडणूक संपताच पाठ फिरवतात.आजवर सर्वच राजकीय नेत्यांनी साकळाईचे भांडवल म्हणून वापर केला .अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या मागणीसाठी हिवरे झरे (ता.नगर या) ठिकाणी रस्ता रोको आंदोलन झाले.यावेळी बाबा महाराज झेंडे, राजाराम भापकर गुरुजी, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, रेवणनाथ चोभे, ज्ञानदेव भोसले, सुरेश काटे,राजेंद्र झेंडे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र म्हस्के, संजय गिरवले, झुंबरराव बोरुडे, संजय धामणे, दादा दरेकर, ज्ञानदेव कवडे, ऍड अनुजा काटे, रामदास झेंडे, अण्णा चोभे, सुनील खेंगट, अंजिनाथ झेंडे, हभप अन्नड महाराज,संतोष लगड, रोहिदास उदमले, प्रताप नलगे, सोमनाथ धाडगे, डॉ.खाकाळ आदी हजर होते.

📌 कोण काय म्हणाले..?
▪️रवींद्र कडूस- सरकार कोणाचेही असो प्रश्न शेतकऱ्यांच्या पाण्याचा आहे.सर्व पक्षीय पुढारी जर आंदोलनात एकत्र येतात तर त्याच भावनेने सगळ्यांनी मिळून साकळाईसाठी एकत्रित लढा देण्याची गरज आहे .पाणी आपल्या उशाला आहे पण आपल्याला मिळत नाही .कोणत्याही नेत्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये.
▪️बाळासाहेब हराळ- नगर तालुक्यातील स्वतः चा आमदार, खासदार नाही.त्यामुळे नगर तालुक्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे.3 टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. साकळाई पाणी योजनेची मागणी 25 वर्षांपासूनची आहे.पण आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार हे ते पाणी त्यांच्या योजनांसाठी ओढून नेणार आहेत त्यामुळे साकळाई पाणी योजनेच्या वाट्याला काही मिळणार नाही.जर असे झाले तर या नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाहीत.

▪️बाबा महाराज झेंडे- आम्ही आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांना वेळोवेळी भेटलो.त्यांनी सांगितले आंदोलन थांबवा आम्ही पाणी मिळवून देतो.पण आता साकळाईला डावलून पाणी पारनेर आणि कर्जत जामखेडला नेण्याचा डाव सुरू आहे.असे झाले तर मंत्री, अधिकारी, यांना घेराव घालू.
▪️अभिलाष घिगे- नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायती भागासाठी ही योजना वरदान ठरणारी आहे, पाणी नसल्याने अनेक तरुण रोजंदारीसाठी गाव सोडून जात आहेत. पाणी आले तर या भागाचा आर्थिक विकास होईल .सर्वांनी एकत्रित येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे.

▪️राजेंद्र झेंडे.- आजवर सर्वच पक्षांनी साकळाईचे फक्त गाजर दाखवले.काही राजकीय पुढारी साकळाई समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देत आहेत.
▪️राजेंद्र म्हस्के- यापुढे लोकप्रतिनिधींना अडवले पाहिजे.
तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता