Take a fresh look at your lifestyle.

“ हे सरकार आहे की सर्कस ? “

दिवाळीच्या तोंडावर जनता तुमच्या नावानं शिमगा करतेय !

मुंबई : राज्यात महागाई भत्ता मिळावा म्हणून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन दिवसांपूर्वीपासून, आंदोलन सुरु आहे. अहमदनगर येथे एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. 
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.या घटनेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.हे सरकार आहे की सर्कस असा सवाल राजू पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
अजून लोकांचे किती हाल करणार?, असे निर्णय जाहीर करणाऱ्या सरकारला जनता शिव्यांची लाखोली वाहात आहे.दिवाळीच्या तोंडावर जनता तुमच्या नावाने शिमगा करीत आहे, अशी जहरी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे प्रवासाच्या नियमावलीवरून मनसे आक्रमक झाली आहे.