Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

 🔸 31 ऑक्टोबर 2021 

0

 

▪️मेष : कर्जाचे व्यवहार करू नयेत. तडकाफडकी निर्णय बदलू नका. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जोडीदाराची साथ मिळेल.
▪️वृषभ : आज प्रवासात काळजी घ्यावी. मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल.
▪️मिथुन : मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. स्वप्नवत वातावरणात रमून जाल. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.
▪️कर्क : आज आवडीवर खर्च कराल.उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा.
▪️सिंह : संमिश्र घटनांचा दिवस असेल. आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. मानसिक आंदोलन ओळखून वागावे.
▪️कन्या : दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल.
▪️तूळ : घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल. जवळची व्यक्ती भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील.
▪️वृश्चिक : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी.
▪️धनू : आज ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल. अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल.
▪️मकर : गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका.
▪️कुंभ : आज फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा.
▪️मीन : कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात. व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल.
Leave A Reply

Your email address will not be published.