Take a fresh look at your lifestyle.

आर्यनच्या जामीनाने शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जीव भांडयात !

 

मुंबई : एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे.त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला आहे.यावरून भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.आर्यनला जामीन मिळाल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादी, शिवसेनेला खोचक सवाल विचारले आहेत. 

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला, असा टोला त्यांनी लगावला आहे.
आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का?, असा सवाल भाजपने विचारला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात क्रुझवरील ‘पार्टी प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात ड्रग्ज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली. त्यानंतर देशभरात याची चर्चा सुरु झाली. यानंतर रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता.
बोगस जात प्रमाणपत्र, भ्रष्टाचार, निकाहनामा जारी करत वानखेडे कुटुंब बोगस असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. आता अखेर आर्यनला जामीन मिळाला आहे.