Take a fresh look at your lifestyle.

दे धक्का ! भाजपा आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी !

उत्तर प्रदेश : सध्या देशातील राजकारणामधील समीकरणे प्रचंड वेगाने बदलत आहेत. त्यातच आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय खेळी खेळल्या जात आहेत.आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी तयारीला लागली आहे. परंतु आता भाजपला एक धक्का बसला आहे.
पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपाच्या एका आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
तसेच बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व आमदारांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
यावेळी अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपाविरोधात जनआक्रोष एवढा आहे की, या निवडणुकीत भाजपा भुईसपाट होईल. अखिलेश यादव यांनी सांगितले की, खूप असे लोक आहेत, जे समाजवादी पक्षात येऊ इच्छित आहेत.
येणाऱ्या काळात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक खेळी खेळल्या जात आहेत.भाजपला धक्का मानला जात आहे.