Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी! सरकारने ‘या’ रब्बी पिकांची वाढवली आधारभूत किंमत !

जाणून घ्या, कोणत्या पिकांना किती बाजारभाव.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी वाढ) वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

नवीन एमएसपी रब्बी पिकांच्या मार्केटिंग सीझन 2022-23 साठी लागू होणार आहे. कोणत्या पिकासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती एमएसपी वाढवली आहे? याबाबत अधिक जाणून घेऊयात…

गहू : प्रति क्विंटल 40 रुपयांची वाढ I 2015 रुपये

हरभरा : किमान आधारभूत किंमत 130 रुपयांनी वाढवली I 5,100 रुपये प्रति क्विंटल

मोहरी : प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ I 4,650 रुपये

मसूर : 400 रुपयांची वाढ I 5,100 रुपये प्रति क्विंटल

बार्ली : 1600 रुपयांची वाढ I 1635 रुपये प्रति क्विंटल

सूर्यफुल : 114 रुपये प्रति क्विंटलने वाढली I 5,327 रुपये प्रति क्विंटल

एका अंदाजानुसार, एमएसपी वाढवल्यानंतर शेतकऱ्यांना मोहरीसाठी खर्चाच्या तुलनेत 100% लाभ मिळेल. तर मसूरवर 79 टक्के, हरभऱ्यावर 74 टक्के आणि सूर्यफुलावर 50 टक्के लाभ मिळणार आहे.