Take a fresh look at your lifestyle.

अनेक महिन्यांनंतर होणार माजी आ.बाबुराव पाचर्णे व कार्यकर्त्यांची गाठभेट !

वाढदिवसाचे औचित्य साधत होणार संवाद.

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : गेली ४० वर्षे शिरुरच्या राजकारणात सर्वसामान्य जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे व आशीर्वादामुळे आपले स्वतःचे वलय निर्माण करणारे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणास्तव गेले अनेक दिवस जनतेला, कार्यकर्त्यांना, पदाधिकारी यांना पाचर्णेसाहेब भेटु शकले नाहीत मात्र दि.२ व ३ नोव्हेंबर रोजी ते चव्हाणवाडी येथील निवासस्थानी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी तसेच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपलब्ध असतील, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी दिली.
शिरुर- हवेलीच्या राजकीय पटलावर हजारो कोटींची विकासकामे करून मतदारसंघातील जनतेला सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी, मतदारसंघाचा समतोल विकास साधण्याचं काम पाचर्णेसाहेब यांनी केले. परंतु कधीही प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कामे न करता जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून विकासकामांना प्राधान्य दिले. आजही २ वर्षांनंतरसुद्धा पाचर्णेसाहेबांनी मंजुर केलेली कामे सुरु असून यावरुनच त्यांच्या काळात शिरुर-हवेलीसाठी न भुतो न भविष्यती एवढा मोठा निधी विकासकामांना आणला गेला.
शिक्रापुर-तळेगाव-न्हावरे रस्ता, न्हावरे- इनामगाव – तांदळी सिमेंट रस्ता, न्हावरे- कर्डे – रांजणगाव गणपती अष्टविनायक मार्ग, मांडवगण फराटा येथील भीमा नदीवरील पुल, पुणे-शिरुर तीनमजली महामार्गासाठी केलेला पाठपुरावा, ठिबक सिंचनाचे अनुदान, शेकडो कोटींचे प्रजिमा, ग्रा.मा.,पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांमधुन मंजुर केलेले रस्ते, वाघोलीसारख्या मोठ्या गावासाठी आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी, शिरुर शहरातील विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा आणलेला निधी, शेतकरी हितासाठी सतत्याने विधिमंडळात मांडलेली भूमिका अशी सांगता येण्याजोगी अनेक कामे पाचर्णेसाहेबांनी मार्गी लावून मतदारसंघात एक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचं काम केले, असे श्री. फराटे यांनी सांगितले.
गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांची उणीव मतदारसंघातील जनतेला सतत जाणवत होती, लवकरच ती ही उणीव आता दूर होवून पाचर्णेसाहेब लवकरच पूर्वीप्रमाणे जनसेवेला सुरूवात करतील. तसेच येत्या १ नोव्हेंबर रोजी सर्व हितचिंतकांनी, कार्यकर्त्यांनी, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांनी, सर्व पदाधिकार्‍यांनी आपल्या गावांमध्ये, परिसरात व मतदारसंघात मा.आमदार पाचर्णे साहेबांच्या माध्यमातुन पूर्ण झालेल्या, सुरु असलेल्या विकास कामांसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसारित करुन पाचर्णे साहेबांना वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन श्री. फराटे यांनी केले.