‘पारनेर’ बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांसाठी “ई-पीक पाहणी नोंदणी” मार्गदर्शन.
शनिवारी ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन.
पारनेर : कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तर्फे शेतकरी बांधवांसाठी एक नविन उपक्रम म्हणुन ऑनलाईन शेती विषयक चर्चा सत्रांचे आयोजन केले जात आहे.सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध असल्याने या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या ई पीक पाहणी या मोबाईल ॲप वर नोंदणी या विषयावर झुम मिटींगव्दारे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने “ई-पीक पहाणी ”ॲपव्दारे शेतकऱ्यांना आपल्या पीकांची नोंदणी स्वत: करावी लागणार आहे.त्याबाबत सध्या अनेक शेतकरी हे अनभिज्ञ आहेत.त्यांना त्याबाबत योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.त्यामुळे यापुढे जर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंद केली नाही तर शेतकऱ्यांना शासनाचे विविध योजना ,पीक कर्ज, पीकविमा योजना , नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे नुकसान, पी.एम.किसान योजना या बाबींपासुन मिळणाऱ्या शासनाचे योजनेच्या लाभांपासुन वंचित राहावे लागणार आहे.म्हणुन शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना या ई- पीक पाहणी बाबत मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर व वाळुंज फार्मर्स प्रोडयुसर कंपनी वाळुंज यांचे संयुक्त विद्यमाने हे ऑनलाईन चर्चा सत्र आयोजीत केले आहे.तरी या चर्चासत्राचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
या ऑनलाईन चर्चा सत्रामध्ये ई-पीक पाहणी नोंदणी या विषयावर कामगार तलाठी एस.यु.मांडगे, कृषी सहाय्यक शुभम काळे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
दि. 11/9/2021 वेळ सकाळी 9.30 वाजता
झुम मिटींग आय.डी. – 86462424118
पासवर्ड – 12345
मार्गदर्शनाबाबत काही शंका असल्यास त्यांनी आपले नाव,गावाचे नांव व प्रश्न 9028055030 या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस किंवा व्हाट्सअप करावे.पुढील मार्गदर्शनांसाठी काही विषय सुचवायचे असल्यास सदर मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस व व्हाट्सअपव्दारे कळवावे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी प्रत्येक महिन्याला शेती विषयक असे 2 मार्गदर्शन सत्र आयोजीत करण्यात येणार आहेत.