Take a fresh look at your lifestyle.

‘या’ प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येणार नाहीत !

तरी पण ट्राय तर करा!

स्पर्धा परीक्षा असो किंवा नोकरी देणारी मुलाखत. त्याबाबत प्रत्येकाला एक वेगळीच भीती असते. पण लक्षात घ्या, मुलाखत ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुमची मानसिक स्थिती किंवा बुद्ध्यांक पातळी तपासली जाते.
फेस-टूफेस सामोरे जाणे यासाठी पूर्वतयारी लागतेच. चला, तर आज आपण IAS इंटरव्‍यूमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांची माहिती घेऊन आलो आहेत. बघा तुम्हाला उत्तरे येतात का? प्रयत्न तर करून पहा…
1. एक पक्ष्यासमोर स्वीट, एक लिंबू आणि तिखट ठेवा. आता सांगा या तीनपैकी पक्ष्याला सर्वात जास्त चवदार काय लागेल?
उत्तर : पक्ष्याला चव घेण्यासाठी चव ग्रंथीच नसतात. यामुळे सर्व स्वाद त्याच्यासाठी एकसारखे असतील.
2. आपल्याकडे फक्त 10 रुपये आहेत. यामध्ये तुम्हाला असे काही खरेदी करायचे ज्याने संपूर्ण खोली भरून जाईल.
उत्तर : काडेपेटी (मॅचबॉक्स) आणि मेणबत्ती. कारण याचा प्रकाश संपूर्ण खोली व्यापून टाकेल.
3. कासव सरासरी किती काळ जगू शकेल?
उत्तर : 200 ते 300 वर्षे. कदाचित त्याच्या चालण्याची गती जितकी हळू-हळू, तशीच जगण्याची गती देखील आहे.