Take a fresh look at your lifestyle.

महिला सक्षमीकरणाचे काम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी करावे !

आमदार निलेश लंके यांची अपेक्षा.

मुंबई : आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर निलेश लंके महिला प्रतिष्ठानचे कार्य सुरू असून यापुढील काळातही महिलांच्या अडी-अडचणी, समस्यांचे निराकरण करून महिला सक्षमीकरणासाठी प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा या कामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले.
मुंबईतील ऐरोली येथे निलेश लंके महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्तीचा सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांना आमदार लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उद्योजक सुरेशशेठ धुरपते हे होते. यावेळी पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते,महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला लटांबळे, सचिव शालिनी खोडदे, निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कैलास पावडे, खजिनदार दिलीप कोरडे, सुनीता कदम,नितीन चिकणे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की कोरोनाच्या काळात जवळचे नातेवाईकही एकमेकांना विचारत नव्हते परंतु या काळात कोरोना रुग्णांना आधार देण्याचे काम आपण केल्याने त्याचे नावलौकिक संपूर्ण देशात झाले.कोरोना काळात अहोरात्र झटून रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमुळेच हे शक्य झाले. याचे श्रेय कार्यकर्त्यांनाच आहे. म्हणूनच समाजासाठी झटणारे प्रतिष्ठान असा या प्रतिष्ठानचा संपूर्ण देशात लौकिक निर्माण झाल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.
सध्या देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले असून यासाठी महिला सक्षम झाली पाहिजे असे सांगत या महिलांना आधार देण्याचे काम महिला प्रतिष्ठानने करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत या प्रतिष्ठानमध्ये समाजाविषयी आत्मीयता असणाऱ्या महिला पदाधिकारी असल्याने त्यांच्याकडून चांगले काम होईल असा विश्वासही आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
पदवीधर मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद माने, रेवणसिद्ध माने यांच्या नियोजनातून सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सौरभ शिंदे, दिनेश घोलप, समर नवले,अजित मोरे, सचिन वाघमारे ,दिलीप घुले, गोविंद साबळे, किरण जमदाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.