Take a fresh look at your lifestyle.

अनोळखी रस्त्याने प्रवास करावाच लागतो !

पण मार्गदर्शक असला तर योग्य ठिकाणांवर पोहोचता येते.

आपण प्रवासाला निघालो की सर्वाधिक संबंध येतो तो रस्त्याशी.असं कधी झालय का, की शेवटच्या ठिकाणापर्यंत रस्ता कुठेच खालीवर नव्हता,त्याला एकही वळण नव्हतं,कुठेही स्पीडब्रेकर नव्हते,कुठेच कच्च्या रस्त्याने जावं लागलं नाही, पायवाटेने जाण्याची वेळ आली नाही? हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण योग्य स्थळी पोहोचण्यासाठी हे माहित असणं गरजेचं आहे की या रस्त्याने गेल्यावर इच्छित स्थळी पोहोचता येईल.
सज्जनहो जीवन प्रवासही असाच आहे. कधी आनंदाचे क्षण तर कधी दुःखाचा प्रसंग. प्रवासात जसं अनेक किलोमीटर सरळ सपाट सुंदर रस्त्याने प्रवास करताना काही काळ मस्त वाटतं,पण कुठलीही हालचाल होत नाही म्हटलं की चालकाला डुकली येण्याचा संभव असतोच.आपलही जीवन एका पट्टीत चालु लागलं की काही काळ बरं वाटतं.मग ते रटाळवाणं होतं.जागृतीत येणाऱ्या व्यक्तीला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा न होईल तरच नवल! जीवंत माणसाच्या जीवनात चढउतार येतातच.जीवंत माणसाचा कार्डिओग्राफ सुद्धा वरखाली असतो.त्यावर सरळ रेषा आली तर तो मृत झालेला असतो. सरळ चाकोरीबद्ध जगणं म्हणजे मृतजीवन आहे.
संकटं येतात तेव्हा त्यातून तरुन जाणं हे सोपं नसतच.पण वेळ कधीच थांबत नाही. सतत परिवर्तन सुरू आहे.प्राप्त झालेली परिस्थिती मग ती चांगली,अतिचांगली किंवा वाईट,अति दयनीय असली तरी ती कायम रहात नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे.
पैशात लोळणारी माणसं दोन वेळच्या जेवनाला महाग झालेली जशी आपण पहातो तशी एका वेळच्या जेवनाला महाग झालेली माणसं आभाळाएवढी मोठी झालेलीही उदाहरणं आहेत.म्हणजेच जीवनात सतत चढउतार आहे. म्हणुनच जीवन जगण्यात मजा आहे. अनुभवाची समृद्धता त्याशिवाय येतच नाही.

खस्ता खाल्लेली माणसं कठीण काळातही तग धरून रहातात.पण ज्यांनी ते चढउतार अनुभवले नाहीत,ज्यांना स्पीडब्रेकर लागला नाही. घाट लागला नाही,ते मात्र कोलमडतात.याचं एकच उत्तर,तुम्ही प्रवास कमी केला आहे. बसुनच जास्त काळ राहिलात,किंवा मार्गच चुकला.मग तो रस्ताप्रवास असो की जीवनप्रवास.आम्ही सतत नव्या अनुभवांना सामोरे जात असतो.
आनंदात काही वेगळं जगावसं वाटलं नाही तरी दुःख मात्र काही तरी वेगळं जगण्याची इच्छा निर्माण करते.चुकांची जाणीव करुन देते.त्यातच मानवी जीवनाचा उत्कर्ष सामावलेला आहे.दुःख निवारणासाठी केलेली तळमळ जीवनाला आकार देते.म्हणून रस्ता सरळ नसावाच.तो खाचखळगे,चढउतारांचाच असायला हवा.त्याशिवाय अनुभव संपन्नता नाही.पण मार्गावर चालताना निश्चितता हवी,खात्री हवी.मग तो कितीही खडतर असला तरी ध्येयापर्यंत नेणारा असेल.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
संत निळोबाराय म्हणतात,जया नाही मार्गाची ठावा।काय ते गावा पावविती।। ज्या गावाला जायचय तो मार्गच माहित नसेल तर त्या गावाला पोहोचणे शक्यच नाही.
म्हणुनच जीवन प्रवासात वाटाड्या असायला हवाच.चुकलं की पुन्हा रस्त्यावर आणुन सोडणारा.संत निळोबाराय म्हणतात,तरोनि आपण आणिका तारिती।जड जीवा दाविती मार्ग सोपा।। संत जीवनातला गुंता सोडवण्यात समर्थ आहेत. जीवन योग्य मार्गाने चालावं असं वाटत असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे.
रामकृष्णहरी