Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून 8 वर्षांचा चिमुकला चालवतोय रिक्षा!

कारण वाचून हृदयाला फुटेल पाझरं..

 

एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. ती म्हणजे कुटुंबाची जबाबदारी संभाळण्यासाठी अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकल्यावर रिक्षा चालवण्याची वेळ आलीय.

आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हैद्राबादमधील हा चिमुकला चक्क ई-रिक्षा चालवत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शाळेचा ड्रेस परिधान केलेल्या या चिमुकल्याला ई-रिक्षा चालवताना पाहिले. यामुळे त्या व्यक्तीला चांगलाच धक्का बसला. त्या व्यक्तीने रिक्षा थांबवून याबाबत विचारणा केली. तेव्हा चिमुकल्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली.

या आठ वर्षांच्या मुलाचं नाव आहे गोपाळ कृष्ण. तो इयत्ता तिसरीमध्ये शिकत असून कुटुंबाला जगवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण करण्यासाठी ई-रिक्षा चालवत आहे. या चिमुकल्याचे आई-वडील दोघेही दिव्यांग असून त्याला भाऊ-बहीण देखील आहेत. या सर्वांच्यात तो मोठा असल्याने घरच्या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर आहे.

गोपाळचे दिव्यांग आई-वडील हे चंद्रगिरी भागात भाजीपाला आणि किराणा माल विकतात. दरम्यान गोपाळच्या वडिलांनी सांगितले कि, मोठा मुलगा त्याचा अभ्यास संपवून आम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतो. तसेच त्यांनी म्हटलं की, सरकारने आमची पेन्शन वाढवायला हवी. सध्या फक्त तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतात.

काही दिवसांपूर्वीच गोपाळला पोलिसांनी पकडले आणि त्याला वाहन न चालविण्याच्या अटीवर सोडण्यात आले आहे. मात्र गोपाळवर समोर कुटुंबाबासाठी काहीच करता येत नसल्याने मोठा पेच उभा राहिला आहे.