Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸29 ऑक्टोबर 2021 

▪️मेष : आज आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. 
▪️वृषभ : विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.
▪️मिथुन : आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल.
▪️कर्क : आज भावनेला आवर घालावी लागेल. जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील.
▪️सिंह : इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा.
▪️कन्या : काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.
▪️तूळ : बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. अहंकाराला खतपाणी घालू नका.
▪️वृश्चिक : खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो.
▪️धनु : कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
▪️मकर : तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील.
▪️कुंभ : आज कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. जुगारातून लाभ संभवतो.
▪️मीन : घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका.