Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या संकटातही मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला !

आ. निलेश लंके यांचे किन्ही येथील समारंभात प्रतिपादन.

पारनेर : राज्यावर कोरोनाचे संकट असताना देखील पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात आपण सर्वाधिक विकास निधी आणु शकलो व यामुळेच मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांना विकासनिधीच्या माध्यमातून न्याय देता आला असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

तालुक्यातील किन्ही येथे आमदार निलेश लंके यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या दहा लक्ष रूपयांच्या स्मशानभुमी सुशोभीकरण कामाचे लोकार्पण व लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या सद्गुरू ओंकारबाबा प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी ते बोलत होते. माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी , प्रा.संजय लाकुडझोडे , ओंकारबाबांचे नातू सुनिल आंबोदकर , उद्योजक नानासाहेब खोडदे ,निलेश लंके प्रतिष्ठान युवकचे अध्यक्ष विजय औटी,शेतकरी नेते अनिल देठे पाटील ,वीज सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे, युवा नेते अभयसिंह नांगरे आदी. यावेळी उपस्थित होते.

आमदार लंके पुढे म्हणाले की, विकासकामांच्या निधीचे वाटप करत असताना पहिल्याच टप्प्यात किन्ही गावासाठी देखील दहा लाख रूपये देऊन विकासकामाची मुहूर्तमेढ आपण रोवली असून यापुढे काळात देखील उर्वरित कामांसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील असेही आ.लंके यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक भास्करराव खोडदे , उद्योजक संभाजी देठे पाटील , सौ.शालिनी खोडदे , उद्योजक चंद्रकांत खोडदे , उद्योजक तानाजी खोडदे , लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मुळे , सद्गुरू ओंकारबाबा शिष्य सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मोढवे , माजी सरपंच मानसिंग देशमुख , विश्वस्त रामदास सावंत , प्रशांत खोडदे , प्रकाश साकुरे , सरपंच पुष्पा खोडदे , उपसरपंच हरेराम खोडदे , श्रीकांत निमसे , जयसिंग मोढवे , राजेंद्र खोडदे , ग्रामसेवक संजय घोलप , प्रा.सचिन मोढवे , योगेश किनकर , शिवाजी खोडदे , साजन खोडदे, शरद व्यवहारे , अशोक किनकर , संतोष खोडदे , पांडुरंग व्यवहारे , बाळासाहेब शिंदे , राजेंद्र मुळे , राहुल खोडदे , साहेबराव खोडदे , सुरेश खोडदे , अण्णासाहेब खोडदे आदी. उपस्थित होते.