Take a fresh look at your lifestyle.

टाकळी ढोकेश्वर गणातील प्राथमिक शाळांना हॕण्डवॉश व सॅनिटाझरचे वितरण !

पारनेर :कोरोना साथीच्या जागतिक महामारीमुळे गेली दिड वर्षे बंद असलेल्या शाळा टप्प्यटप्प्याने सुरु होत आहेत.नुकत्याच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये सुरु झाली असून लवकरच प्राथमिक शाळा ही सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुरक्षितेसाठी टाकळी ढोकेश्वर गणाच्या पंचायत समिती सदस्या सौ.सुप्रिया साळवे यांनी पंचायत समिती च्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गणातील सर्व प्राथमिक शांळासाठी हॕण्डवॉश स्टॕण्ड व सॕनिटाझर उपलब्ध करुन दिले. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेत वितरण कार्यक्रम पार पडला. 
कोरोनाची तिव्रता कमी झालेली असली तरी कोरोना पुर्णपणे थांबलेला नाही.शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळेत येण सुरक्षित व आरोग्यदायी व्हावे.पालकांना ही मुलांना शाळेत पाठवताना एक सुरक्षित भावणा राहावी या मुळेच टाकळी ढोकेश्वर गणातील प्राथमिक शाळांना सॅनिटाझर स्टॕण्डचे वितरण करण्यात आले असे मनोगत यावेळी सौ. साळवे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी टाकळी ढोकेश्वर गणातील सर्व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.