पारनेर : भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका व शहर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना ,एसटी कामगार सेना व राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस यांनी महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या विरोधात एसटी कामगार प्रलंबित प्रश्नांसाठी बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यात आला.
भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ चेडे,शहराध्यक्ष किरण कोकाटे यांनी यावेळी निवेदन दिले.याप्रसंगी वसंत चेडे यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांविषयी चर्चा करताना लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या व एसटी कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी बाबासाहेब हरिभाऊ चेडेे ,किरण कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच लवकरात लवकर शासनाने एसटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपा पारनेर च्या वतीने देण्यात आला.