Take a fresh look at your lifestyle.

लालपरी सेवकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी पारनेर आगारात बेमुदत उपोषण !

एस.टी.महामंडळ शासनात विलीन करण्याची मागणी.

 

पारनेर :दीपावलीच्या सणाच्या कालावधीमध्ये आपल्या विविध मागण्यांसंदर्भात संयुक्त कृती समिती कामगार एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेत पारनेर आगारात उपोषण सुरू केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे एस.टी.महामंडळ तोट्यात गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणेही अवघड झाले आहे . या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्या कारणाने त्यांना उपजीविका चालवणे ही अवघड झाले आहे .
काही दिवसापूर्वी बंद असणारे लालपरी रस्त्यावर धावू लागली एस.टी.चे चाके फिरले परंतु कर्मचाऱ्यांना अजूनही वेळेवर पगार होत नाही.व गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोण म्हणतंय देणार नाही ?घेतल्याशिवाय राहणार नाही !
या प्रकारे घोषणा देत वेतनवाढ, दिवाळी भेट आदी मागण्यांसाठी राज्य तसेच विभागीय पातळीवर उपोषण करूनही दखल न घेतली गेल्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुपोषणाचे लोन आगार पातळीपर्यंत पोहोचले आहे गुरुवारी सकाळी सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पारनेर आगारात उपोषणास प्रारंभ केला सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे पारनेर आगारातून एकही बस बाहेर पडली नाही परिणामी प्रवाशांची चांगलीच कुचंबना झाली.कोरोना महामारीमुळे अनेक महिने एस.टी.च्या फेऱ्या बंद होत्या परिणामी एस .टी .च्या उत्पन्नावर परिणाम होत कर्मचाऱ्यांचे पगारही लांबणीवर पडू लागले .पगार कपात तसेच आर्थिक विवंचनेमुळे राज्यभरात तब्बल 25 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन यात्रा संपवली कोरोनाचे निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या खर्‍या मात्र डिझेल अभावी अथवा या ना त्या कारणामुळे अनेक फेरी नियमित होत नव्हत्या उत्पन्नवाढीसाठी कर्मचारी परिश्रम घेत असताना त्यांच्या हाती मात्र मोबदला मिळत नसल्याने सर्वत्र असंतोष आहे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवर मागण्या करूनही त्यास दाद दिली गेली नाही . तुटपुंजी मदत घेऊन कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झाला त्या विरोधात राज्य विभागीय पातळीवर उपोषण करण्यात आली त्याची दखल न घेतल्याने आता पातळीवर उपोषण सुरू झाले आहे . पारनेर आगारातील सर्व कर्मचारी एकत्र आले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
राज्य शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता लागू करावा,करार मान्य केल्या प्रमाणे घरभाडे भत्ता 7,14,21 वरुन 8,16,24 असा लागू करावा वेतन वाढीचा दर 2 टक्क्यावरून 3 टक्के करण्यात यावा. दिवाळी भेट 15,000 रुपये देण्यात यावा, अँग्री उचल राज्य शासना प्रमाणे बारा हजार पाचशे रुपये करण्यात यावी . महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी सर्व संघटना एकत्र येऊन संघर्ष करीत आहेत.
पारनेर येथील आंदोलनात सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसह सुरेश औटी,राजू गायकवाड,संतोष भोर,सोनवणे विशाल झावरे, सोमनाथ शहाणे ,दिगंबर अडसूळ संजय ढोणे , राजू पठाण ,दत्ता कोरडे,संतोष ठुबे,अरुण मोकाते,शीतल मोरे ,आबा भोंडवे, सचिन थोरात ,संजय पवार,स्वरूपा वैद्य ,वर्षा नगरे,कल्पना नगरे ,बबलू शेख,किरण जाधव , मच्छिंद्र शिंदे,रामदास थोरात , संभाजी ठुबे,वैभव साळवे,बापू लगड,आनंदा आढाव,जयसिंग वाळुंज यांच्यासह सर्वच कर्मचारी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत.
▪️घोषणाबाजी करून केला संताप व्यक्त.
महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी सगळेच कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत वरिष्ठ पातळीवर मात्र कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात नाही त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजी देऊन त्यांचा आक्रोश बाहेर आला.व जोपर्यंत आमच्या विविध मागण्या सोडवल्या जात नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असणार असे संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी स्पष्ट केले.