Take a fresh look at your lifestyle.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग !

प्रकृती स्थिर ; वैद्यकीय उपचार सुरू.

मुंबई :राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियातून याची माहिती दिली आहे. त्यांना संसर्ग होण्याची ही दुसरी वेळ आहे. 
यापूर्वी गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, ‘करोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.
नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.’
गेल्यावर्षी २९ ऑक्टोबरला वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. दैनंदिन कामकाजासाठी सकाळी ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतले होते. त्यावेळीही त्यांनी ट्वीट करत माहिती दिली होती.