Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸28 ऑक्टोबर 2021 

 

▪️मेष : आज वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल.
▪️वृषभ : आपले मानसिक आरोग्य जपावे. अतिविचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल.
▪️मिथुन : आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील.
▪️कर्क : जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये.
▪️सिंह : अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा.
▪️कन्या : गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा.
▪️तूळ : नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. घरात सामंजस्याने वागावे लागेल.
▪️वृश्चिक : रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील.
▪️धनु : नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
▪️मकर : भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल.
▪️कुंभ : जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. काही गोष्टींचे चिंतन करावे.
▪️मीन : आज कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. अतिघाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा.