Take a fresh look at your lifestyle.

खा.शरद पवार, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यात बंद दाराआड चर्चा !

"या" विषयावर चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती.

नवी दिल्ली : राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली भोसले ( सय्यद) यांच्यात नवी दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवास्थानी बंद दारा आड तब्बल 40 मिनीटे विविध विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे
सिने अभिनेत्री दिपाली भोसले, सय्यद या गेल्या वर्षापासून सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत असून या कामाचे कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले आहे.
दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबलच्या माध्यमातून 2019 सांगली येथे पुर आल्या नंतर पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील पूरग्रस्त लोकांना 5 कोटी रूपयांची मदत करून 1000 हजार मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते वाटप केले होते.
कोल्हापूर येथे पूर आल्यानंतर 10 कोटी रुपयांची मदत ट्रस्टच्या माध्यमातून केली या सर्व कामाची माहिती खा.शरद पवार यांनी घेतली असल्याची, व राष्ट्रपती निवडणूक, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकावरही चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.