Take a fresh look at your lifestyle.

अरे देवा ! व्यासपिठावर बोलता-बोलताच कॉंग्रेस नेत्याचा मृत्यू !

 

जयपूर : राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान् व्यासपिठावर सूत्रसंचालन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या नेत्याला हृदय विकाराचा तिव्र झटक्या आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत स्टेजवरच या युवक काँग्रेसच्या नेत्याचा मृत्यू झाला.
राजस्थानच्या धरियावद विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसकडून लसाडिया येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मुख्यमंत्री अशोक गहलोत संबोधित करणार होते. यावेळी व्यासपीठावर संचालनाची जबाबदारी मोहब्बत सिंह निंबोल यांच्याकडे होती.
राजस्थान युवक काँग्रेसचे माजी प्रवक्ते असलेले मोहब्बत सिंह निंबोल सूत्रसंचालन करत होते. सभेला लोकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळातच सभास्थळी मुख्यमंत्री अशोक गहलोत पोहचणार होते. मात्र तत्पूर्वी सभेच्या व्यासपीठावर बोलता बोलता युवक काँग्रेसचे नेते मोहब्बत सिंह निंबोल यांना अचानक ह्दयविकाराचा झटका आला.
मोहब्बत सिंह जागेवरच खाली कोसळले. मोहब्बत सिंह यांना तातडीने लसाडियाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. यानंतर त्यांना मृत घोषीत करण्यात आले. मोहब्बत सिंह निधनावर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
मोहब्बत सिंह यांच्या आकस्मित निधनाने मनाला वेदना झाल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, असे अशोक गेहलोत म्हणाले.