पारनेर: सभासदांना पिक कर्ज वसूल वाटप आणि त्यामधून संस्थांना होणारा नफा तसेच यापुढे संस्थांना उद्योग व्यवसाय कसे करता येईल याकडे प्राधान्याने लक्ष देत व सहकारामध्ये नवीन काही बदल वैद्यनाथन कमिटी व त्याबाबत भविष्यात असणारे नियोजन, विविध सेवा संस्थांच्या भविष्यातील वाटचालीवर गुंतवणूक योजना लाभ लघुउद्योग प्रस्तावाबाबत माहिती तसेच 97 वी घटना दुरुस्ती सहकारी कायदा नियम यातील सुधारित बदल महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2017 त्याचप्रमाणे ऑडिट व ताळेबंद यासारख्या विषयांवर पुणे येथील यशदा सहकार प्रशिक्षण संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव यांची नुकतीच कार्यशाळा पार पडली.
याप्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन उदयराव शेळके म्हणाले की वि. का. सेवा संस्था सहकारामध्ये एक आत्मा आहे व सचिव त्याचा पाया आहे. आजची ही कार्यशाळा आहे ती सहकारातील काही बदल व त्यात होणारे बदलानुसार परिणाम यासाठी आहे. आजची कार्यशाळा विविध तज्ञांच्या माध्यमातून आणि पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत असताना तालुक्यामध्ये वि.का. सेवा सोसायटी एक स्मार्ट संस्था बनली पाहीजे आणि त्यामधून संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक बाबीने सक्षम कसे करता येईल व तसेच सेवा संस्थाना बळकटीकरण करण्याचा मानस जिल्हा बँकेच्या माध्यमातून सचिवांच्या सहकार्याने व सभासंदाच्या सहकार्यातून हे शक्य आहे असे शेळके म्हणाले.
सभासदांना सेवा संस्थेच्या माध्यमातून अजून अर्थिक लाभ कसा होईल त्यातून संस्थाचा नफा कसा वाढेल त्यामुळे सचिवांना भविष्यातील विकासाबाबत, वैदयनाथन कमिटी, लघू उद्योग व्यावसासिक दृष्टीने सहकाराच्या माध्यमातून सेवा संस्थच्या नफ्यांची बाजू मजबूत करणे हेच उद्दिष्ट असून एक दिवसीय कार्यशाळेमध्ये आयोजित प्रसंगी त्याचप्रमाणे वसूली बाबत सर्व सचिवांचे कौतुक आहेच तसेच जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात एक माॅडल म्हणुन वेगळी ओळख निर्माण करणार असे बॅकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यशदा सभागृह पूणे येथे ही एकदिवसीय कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी आयोजित केली होती .या कार्यक्रमाप्रसंगी सहकार संचालक प्रदीप गारोळे, डॉ. महाल, एस बी पाटील , अप्पर आयुक्त तथा सहसचिव मंत्रालय मुंबई, ॲड. महेंद्र खरात लेखापरिक्षक पुणे तसेच बापुसाहेब चंदन , दत्ता पतके आणि तालुक्यातील 105 सेवा संस्थांनचे 51 सचिव त्याचप्रमाणे तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, प्रभाकर लाळगे , राजू पठारे, अमोल रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.