Take a fresh look at your lifestyle.

…आणि 24 वर्षाची महिला बनली 21 मुलांची आई! 

आश्चर्य वाटले ना ? मग सविस्तर वाचाच !

 

शीर्षक वाचून तुम्ही हैराण झाले असाल आणि ते साहजिक आहे. मात्र सविस्तर बातमी जाणून तुम्हाला अभिमान वाटेल एवढं नक्की.

ही महिला रशियात राहणारी असून तिचे नाव क्रिस्टीना ओझटर्क असे आहे. वयाच्या १७ व्या वर्षी तिने आपल्या पहिल्या बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिल्यानंतर अवघ्या 10 महिन्यांत 10 सरोगेट बाळांना जन्म दिला आहे. या सरोगेटपासून ती आणि तिचा पतीने आणखी 21 बाळांना जन्म दिलाय. आजघडीला ही महिला 21 मुलांची आई आहे. या सर्व मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने एकूण 16 आया ठेवल्या आहेत.
क्रिस्टीना सध्या 24 वर्षांची असून ती जॉर्जिया, गॅलिपमधील एका करोडपतीची पत्नी आहे, तिने गेल्या वर्षी मार्च ते या वर्षी जुलै दरम्यान सरोगेट्सद्वारे पालक होण्यासाठी 1,46,78,156 रुपये खर्च केले आहेत. क्रिस्टीना घरात राहणाऱ्या 16 आयांवर दरवर्षी 72,08,265 रुपये एवढा खर्च करते. या मुलांची काळजी घेण्यासाठी आया 24 तास काम करतात.
सध्या या कुटुंबात क्रिस्टीना तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसह एकूण 23 मुले एकाच छताखाली राहतात. सध्या क्रिस्टीना आवर्जून सांगते की, ती एक व्यावहारिक आई आहे. ती म्हणते ‘मी लहानपणापासून हे स्वप्न पाहत आहे. माझ्या पतीनेही एक मोठे, आनंदी कुटुंब असावे असे स्वप्न पाहिले होते. म्हणून आम्ही भेटल्यानंतर आम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणू लागलो.