Take a fresh look at your lifestyle.

सबाजीराव गायकवाड ‘कोविड वॉरियर’ पुरस्काराने सन्मानित !

पारनेर : कृषीभूषण सबाजीराव गायकवाड यांनी कोरोना काळात आर्युवेदाच्या माध्यमातून स्वखर्चाने जनजागृती करुन लाखो रुग्णांना बरे केल्याबद्दल जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने त्यांना कोविड वॉरियर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री.गायकवाड यांनी तब्बल पंधरा लाख रुग्णांना कोरोना मुक्त केले आहे.एक चमचा मीठ, एक ग्लास पाणी एकत्र करून पिल्याने चौथ्या दिवशी एक उलटी किंवा एक जुलाब होतो त्याद्वारे आपल्या शरीरातील असलेला संपूर्ण कफ बाहेर पडतो व रुग्ण कोरोना मुक्त होतो. यासाठी गायकवाड यांनी 25 जणांची टीम तयार केली होती. दिवसभर येणारे कॉल त्या सर्व टीमने हाताळले.ही सेवा दोन महिने सुरू होती त्यामधून संपूर्ण भारतातील रुग्णांना फायदा झाला. बरे झालेले रुग्णच आता या उपचार पध्द्तीचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
पाचगणी येथे झालेल्या पुरस्कार वितरणप्रसंगी माजी मंत्री अण्णा डांगे, पाचगणी, महाबळेश्वर, वाई विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अर्चनाताई मकरंद पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर, साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार आदी मान्यवर उपस्थित होते