Take a fresh look at your lifestyle.

कोरोना : पारनेरकरांची चिंता पुन्हा वाढली !

 

पारनेर : नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत असतानाच आज (मंगळवारी) पुन्हा बाधितांच्या संख्येत 103 ने वाढ झाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 200 कोरोना बाधितरूग्ण
आढळून आल्याने पुन्हा चिंतेत भरच पडली आहे.

काल (सोमवारी ) नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शंभराच्या आत
आली होती. मात्र आज पुन्हा हा आकडा 103 ने वाढून दोनशेच्यावर पोहोचला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये कर्जत व पारनेरचा आकडा सर्वाधिक आहे.

सोमवारी शुन्यावर आलेली पाथर्डी तालुक्याची रुग्णसंख्या पुन्हा 6 वर आली आहे. पाथर्डी बरोबर जवळपास सर्वच तालुक्यांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 77, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 82 तर अँटीजेन चाचणीत 41 असे 200 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे कर्जत 24, पारनेर 24, राहाता 17, नगर ग्रामीण 16, राहुरी 16, श्रीगोंदा 16, कोपरगाव 15, संगमनेर 13, नगर शहर 12, अकोले 10, नेवासा 8, इतर जिल्हा 8, शेवगाव 8, पाथर्डी 6, श्रीरामपूर 4, जामखेड 2 मिलटरी हॉस्पिटल 1 असे कोरोना बाधित आढळून आले.