स्वतःला आनंदी ठेवणे आणि आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवणे ही एक कला आहे. ती कला अवगत करणं जमलं कि, जगणं सुखकर होईल. चला, तर आपल्या आयुष्यातील आनंद कायम ठेवण्यासाठी खालील काही गोष्टी करूयात…
● कधीही रिअॅक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करा.
● तुमचा भूतकाळ विसरा. भूतकाळ सोबत घेऊन चालू नका अन्यथा त्रासच होईल.
● तुमच्याकडून भूतकाळात झालेल्या चुका परत करायच्या नाही असा निर्धार करून पुढे चालत रहा.
● चांगली व वाईट वेळ येत राहील, जात राहील, हे सत्य स्वीकारा. यामुळे मनाची स्थिरता टिकून राहील.
● आनंद, प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुमचा आनंद तुमच्या अवती-भोवती असलेल्या लोकांशी निगडीत आहे.
● विविधता ही सहन करण्याची नव्हे, साजरी करण्याची गोष्ट आहे. सगळे विश्व एक कुटुंब आहे या भावनेने जगाकडे पाहा.
● दररोज एक नवीन मित्र बनवा. नेहमी गंभीर राहू नका. मनसोक्त हसा आणि जीवनाचा आनंद लुटा.
● कोणीही वाईट नसतं. काही लोक दिशा चुकतात हे ध्यानात असू घ्या.
● कधीही हार मानू नका. प्रयत्न सुरूच ठेवा. आनंदी राहा अणि आनंद वाटा.
आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी करा, एवढंच सांगणं आहे…