Take a fresh look at your lifestyle.

आमदारांनी स्वत: तिकीट काढून केला बसप्रवास !

गावात बस सुरू झाल्याने ग्रामस्थ आनंदले !

शिरूर : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पुणे स्टेशन ते न्हावरा ही बस सेवा सुरू करण्यात आली. न्हावरे येथे आमदार अशोकबापू पवार यांच्या हस्ते व माजी आयएएस अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.

यावेळी आमदार अशोक पवार यांनी स्वतः तिकीट काढून बसमधून प्रवास केला.सकाळीच सजवलेली पहिली बस न्हावरे गावात पोहचली त्यावेळी ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. याबसचे पूजन आमदार अशोक पवार यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत काका कोरेकर, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, सरपंच अलकाताई शेंडगे, कारखान्याचे संचालक गोविंद राजेनिंबाळकर, उपसरपंच बिडगर ताई, निराधार योजनेचे सदस्य गोरख तांबे, पीएमटीचे अधिकारी तसेच न्हावरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य संदीप दादा यादव, मोहनराव सरके, वृषालीताई कांगुणे, संध्याताई कदम, संभाजी कुठे सर, लालासाहेब कोकरे, माजी सरपंच रोहिणीताई कोरेकर, अमोल कांगुणे, महादेव आण्णा जाधव, गोपाळराव हिंगे, भानुदास सात्रस सर, संभाजीराव बिडगर, गौतमराव कदम, अरुण तांबे व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते.