Take a fresh look at your lifestyle.

या” जिल्ह्यात लागणार पुन्हा कडक निर्बंध !

मुख्यमंत्री म्हणाले,दोन दिवसात नियमावली जाहीर होणार.

 

मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होवू लागली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली. या बैठकीत गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल, या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवासाठी पुढील दोन दिवसांत कोरोना प्रतिबंधक नवी नियमावली जाहीर करण्यात येईल.

सण-उत्सवापेक्षा घरातील माणूस महत्त्वाचा आहे. आपण सण नंतरही साजरे करू शकतो, सणांपेक्षा लोकांचे प्राण महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत म्हणाले, नागपुरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. कडक निर्बंध आवश्यक आहेत. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. आतापर्यंत एकेरी आडके समोर येत होते. आता मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांची दुहेरी आकडवारी समोर आल्याने धडकी भरली आहे. सोमवारी नागपूर शहरात 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत निर्बंध लावण्यात येतील, असे संकेत नितीन राऊत यांनी दिले आहेत.नागपूर जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं दस्तक दिली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागीत कडक निर्बंध लावावे लागणार आहेत.

शहरातील दुकानांच्या वेळा पुन्हा दुपारी 4 वाजेपर्यंत तर रेस्टॉरंटच्या वेळा पुन्हा 8 वाजेपर्यत करण्यात येतील. तसेच विकेण्डला म्हणजेच शनिवार, रविवार बाजारपेठा संपूर्ण बंद ठेवाव्या लागणार आहेत. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन नितिन राऊत यांनी केले आहे.