Take a fresh look at your lifestyle.

अडीच अक्षरांचं रहस्य !

प्रेम हेच जीवनाचं सार आहे.

अडीच अक्षरांचा ब्रम्हा,अडीच अक्षरांचा विष्णु,अडीच अक्षरं सृष्टी,अडिच अक्षरं लक्ष्मी,अडीच अक्षरं दुर्गा,अडीच अक्षरं अल्ला,अडीच अक्षरं श्रद्धा,अडीच अक्षरं ध्यान,अडीच अक्षरं भक्ती,अडीच अक्षरं जन्म,अडीच अक्षरं मृत्यू,अडीच अक्षरं प्रेम.अडीच अक्षरं त्याग,अडीच अक्षरं
क्रोध.आहेना…गंमत.जीवनाचं सार यात दडलं आहे. अडीच अक्षरं जीवन संपवतात,अडीच अक्षरं जीवन देतात आणि अडीच अक्षरं जीवन घडवतात.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
संत कबिर म्हणतात, ढाई अख्खर प्यार का पढे सो पंडित होई.ही अडिच अक्षरं प्रेमाची जगता यायला हवीत.
प्रेम या अक्षरावरची सर्व यादी सामावते.अगदी देव सुद्धा प्रेमात बांधले जातात.प्रेमच त्याग करायला शिकवतं.आपल्याला नसलं तरी चालेल पण माझ्या मुलाला सर्व मिळालं पाहिजे ही त्याग भावना प्रेमातुन जन्माला येते.नवरात्रात अनवाणी चालताना चपलेचा त्याग दैवीप्रेमाचं प्रतिक आहे.
रमजानातले रोजे म्हणजे उपवास,अन्नत्याग हे दैवीप्रेमाचं प्रतिक आहे.आणि हे सहजतेने घडतं.भक्ती सहजतेने घडते.कारण तत्व स्पर्श.

आपल्याला पाण्याची ठिकाणं सर्वाधिक आवडतात.धबधबा,धरण,सागर किनारा या ठिकाणांवर सर्वाधिक गर्दी का असते?कारण तत्व स्पर्श. आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात जलतत्व आहे.पृथ्वीवर सर्वाधिक पाणी आहे.त्यामुळे हे आकर्षक आहे. असं प्रत्येक तत्वाचं वैशिष्ट्य आहे.
जीवनात सर्वाधिक आनंदी रहाण्याचं तंत्र पृथ्वीतत्वात आहे.नम्र,विनयशीलता नत होण्याची जादु या तत्वात आहे.प्रेमभावना हे त्याचं अस्र आहे.आम्ही या अडिच अक्षरं प्रेमाचा अंगीकार केला तर अग्नितत्वाचा म्हणजे क्रोधभावनेचा सामना करावा लागणार नाही.प्रयत्नांनी हे साधणारं आहे.
रामकृष्णहरी