Take a fresh look at your lifestyle.

आ.निलेश लंके यांच्यावर साकारणाऱ्या चित्रपटाचे परदेशातही चित्रीकरण !

राजकारणाचा 'आखाडा' गाजविणारा मल्ल आता रुपेरी पडद्यावर !

पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या जिवनावर आधारीत ‘आखाडा’ या चित्रपटाचे चित्रीकरण भारतासह परदेशातही करण्यात येणार असल्याची माहीती दिग्दर्शक भाउसाहेब इरोळे यांनी दिली. नगर जिल्हासह आ. लंके यांचे श्रध्दास्थान असलेले वैष्णौदेवी, मुंबई, दिल्ली येथे तर काही चित्रीकरण परदेशातही करण्यात येणार आहे.
चित्रपटाचे लेेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे हे असून आ. लंके यांच्याशी त्यांचेे घनिष्ठ सबंध आहेत. या चित्रपटासाठी लोकसहभागातून निधी उभा केला जाणार असून लवकरच चित्रीकरणास प्रारंभ करण्यात येणार आहे. अश्‍वयुग फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या या चित्रपटातील गाण्यांचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. या चित्रपटात हिंदी, तेलगू तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकीत कलाकार या चित्रपटात विविध भुमिका वठविणार आहेत.
‘आखाडा’ च्या स्क्रिप्ट पुजनानिमित तसेच नावाच्या घोषणेच्या पार्श्‍वभुमिवर संत परंपरेतील अखेरचे संत संत निळोबाराय यांचे समधीस्थळ असलेल्या पिंपळनेर येथे सलग पाच दिवस श्रीमान योगी ग्रंथाचे पारायण तसेच त्रिकाल संध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. आ. लंके यांच्या आई – वडीलांच्या हस्ते तिन तासांचे श्री गणेश हवन करण्यात आले. मराठी तसेच हिंदी – चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रथमच पाच दिवस स्क्रिप्ट पुजन तसेच नावाच्या घोषणेच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्क्रिप्ट पुजनानिमित्त श्री गणेश, माता वैष्णो देवी, मोहटादेवी, आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमांचे पुजन, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाभिषेक करण्यात आला.
अभिनेत्री, कोरिओग्राफर अश्‍विनी इरोळे यांनी सलग चार दिवस श्रीमान योगी ग्रंथाचे पारायण करून हा ग्रंथाचे वाचन पुर्ण केले. पारायणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिकाल संध्याच्या आरत्या दररोज वेळेत पार पाडण्यात आल्या. राज्यातील हजारो शिवभक्तांना पारायणाचा तसेच दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण लोंढे यांनी केले तर अश्‍वयुग इव्हेंट मॅनेटमेंटने त्याचे नियोजन केले होते.