पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील भूमिपुत्र ,रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर प्रा. डॉ.संतोष भुजबळ यांना शारीरिक शिक्षण या विषयामध्ये टोंगा येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांच्याकडून डी.लिट.ही मानाची पदवी बहाल करण्यात आली.
प्रा.डॉ.संतोष भुजबळ हे कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व असून खेळाडू म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे.एस.ए.आय आणि एन.आय.एस.ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. कोच म्हणून त्यांनी अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये तयार केले आहेत.तसेच इनडोअर आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय पंच
ट्रॅडिशनल रेसलींग(बेल्ट रेसलींग)
असोसिएशन महाराष्ट्राचे विभागीय सचिव,विविध खेळांच्या संघटनेवर पदाधिकारी म्हणून प्रा.डॉ. भुजबळ कार्यरत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या मालकीचे कोट्यावधी रुपयांचे भाळवणी येथील मंगल कार्यालय कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरासाठी त्यांनी विना मोबदला दिले होते.
प्रा.डॉ. भुजबळ यांना नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने डी लिट ही पदवी बहाल केल्याने पारनेर -नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रा. भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. भुजबळ यांना मिळालेला सन्मान हा पारनेरकरांसाठी अभिमानास्पद असून त्यांच्या अथक परीश्रमाचे चिज झाल्याचे गौरोद्गार आ. लंके यांनी व्यक्त केले.
दादा पाटील महाविद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात नाव उंचावत असताना प्रा.भुजबळ यांनी घेतलेली ही भरारी निश्चित कौतुकास्पद असून डी. लिट अवॉर्ड आपल्या भागात तथा युनिव्हर्सिटी मध्ये सर्वप्रथम आपणांस मिळाला ही सर्वांच्या साठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही प्रा. भुजबळ यांचे अभिनंदन केले.