Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा राजसाहेबांना फोन.. म्हणाले की..

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व राज ठाकरेंचे भाऊ उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला.
उद्धव ठाकरेंनी राज यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर राज यांच्या आई आणि बहिण जयंवती ठाकरे देशपांडे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. ठाकरे कुटुंबातला हा भावनिक क्षण होता.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या आईंची तब्येत आता ठीक असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. राज ठाकरे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ताप कमी झाला आहे, खोकल्याचा कोणताही त्रास त्यांना नाही. श्वास घेण्यासाठीही कोणताही त्रास त्यांना जाणवत नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आज रात्रीच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचे येत्या काही दिवसातील सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.