Take a fresh look at your lifestyle.

सुजित झावरे पाटील महाराष्ट्र विकास रत्न पुरस्काराने सन्मानित !

पारनेर : दुष्काळी पारनेर तालुक्यात नदीजोड प्रकल्प यशस्वी राबविल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल यांनी सन्मान केला होता. सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यात पाणीप्रश्नावर आतापर्यंत उत्तम असं काम केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकसत्ता संघर्ष समितीच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र विकास रत्न पुरस्कार 2021 देऊन अहमदनगर या ठिकाणी नुकतेच गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा अहमदनगर शहरातील माऊली संकुल येथे संपन्न झाला लोकसत्ता संघर्ष साप्ताहिकाच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शैक्षणिक सामाजिक कृषी कला-क्रीडा सहकार क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केलेले महाराष्ट्रातील कानाकोप-यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व मोही मूव्ही ड्रीमअर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या चेअरमन डॉ. अलका कांबळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की दुष्‍काळी पारनेर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावर काम करत असताना मी नेहमी नेहमीच नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबवत आहे. तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नदीजोड प्रकल्प सारखा राज्यात आदर्शवत असा उपक्रम राबवून तालुक्यातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवण्याचा मी प्रयत्न केला असून यापुढील काळात दुष्काळी पारनेर तालुक्यात पाणी प्रश्नावर आणखीन उत्तम काम करण्याचा माझा मानस आहे.
लोकसत्ता संघर्ष या साप्ताहिकाच्या वतीने सुजीत झावरे पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र विकास रत्न पुरस्कार 2021 देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन लोकसत्ता संघर्ष समितीचे संपादक प्रकाश साळवे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केशवभाऊ मगर उपाध्यक्ष नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा, संदीप माळी संस्थापक अध्यक्ष जनसेवा पतसंस्था सांगली, सुवर्णा जोशी नगराध्यक्षा कर्जत, मुंबई मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत नेटके पाटील, ह. भ. प. सिद्धनाथ मेटे महाराज, गणेश कराळे अशोक झोटिंग, संदीप साळवे, राजेश जाधव, नीता प्रकाश, श्रुती बत्तीन बोजा व्यवस्थापक लोकसत्ता संघर्ष, प्रकाश कराळे आदी मान्यवर व पत्रकार नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत.