Take a fresh look at your lifestyle.

वटवाघूळ झाडावर उलटे लटकण्याचे कारण माहिती आहे का?   

तुम्ही पहिले असेलच कि, वटवाघुळ झाडांवर लटकलेले असतील. मात्र असे लटकण्यामागील कारण कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आज त्याबाबत जाणून घेऊयात…

एका माहितीनुसार, जगभरात वटवाघूळांच्या 1000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती तर केवळ रक्त पितात. त्यांना ‘पिशाच वटवाघूळ’ देखील म्हटले जाते.
बहुतांश वटवाघूळ तपकिरी आणि काळ्या रंगाचे असतात. वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार वटवाघूळ जवळपास 10 कोटी वर्षांआधी डायनासोरच्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.

वटवाघूळ सहजपणे उडू शकतात. इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघूळ जमिनीवरून उड्डाण घेत नाही. कारण इतर पक्ष्यांप्रमाणे त्यांचे पंख उडण्यास एवढे सक्षम नसतात. याशिवाय त्यांचे पाय लहान आणि अविकसित असतात, ज्यामुळे ते धावून गती पकडू शकत नाहीत.

उलटे लटकून देखील संतुलन कायम कसे राहते? : याचे उत्तर म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्या. त्यांच्या रक्तवाहिन्या अशा प्रकारे विकसित झालेल्या असतात की, त्यांचे वजनच त्यांच्या पंज्याला घट्टपणे पकडून ठेवण्यास मदत करतात.