Take a fresh look at your lifestyle.

पारनेरातील सर्व सत्तास्थाने काबीज केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !

आमदार निलेश लंके यांची गर्जना.

 

पारनेर : आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असून तालुक्यातील सर्व सत्तास्थाने काबीज केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील सुमारे नऊ कोटी 38 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाळवणी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाराम रोहोकले हे होते.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, उद्योजक सुरेशशेठ धुरपते,अशोकराव सावंत, विक्रम कळमकर, जितेश सरडे, नानासाहेब रोहोकले, अशोक रोहोकले आदी या वेळी उपस्थित होते.
जामगाव ते सारोळा अडवाई रस्ता सुधारणा करणे, जामगाव माथा साठे वस्ती ते लोणी हवेली रस्ता सुधारणा करणे, धोत्रे ते नगर कल्याण हायवे ते धोत्रे खुर्द रस्ता सुधारणा करणे, भाळवणी ते हनुमानवाडी रस्ता सुधारणा करणे, भाळवणी ते दैठणे गुंजाळ रस्ता सुधारणा करणे, जामगाव येथे हाडोळा वस्ती जलपूजन, कोल्हापुरी बंधारा मेहेर वस्ती जलपूजन आदी विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेत भाळवणी येथील आरोग्य मंदिरामुळे मतदारसंघातील हजारो रुग्णांचे प्राण वाचले याचा अभिमान असल्याचे सांगत आमदार लंके म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अर्थमंत्री असल्याने तालुक्याच्या विकासाला निधीचे झुकते माप मिळत असल्याने अनेक विकासकामे सुरू आहेत. या पुढील काळातही प्रलंबित विकास कामांना गती देणार असल्याचे आश्वासनही आमदार लंके यांनी दिले.

तालुक्याची वाटचाल वेगळ्या उंचीवर सुरू असून आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणूकीची सत्ता कोणत्याही परिस्थितीत काबीज केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत सर्व ताकदीनिशी या निवडणुका आपण जिंकणार असल्याचा विश्वासही आमदार लंके यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक बाबासाहेब तरटे यांनी तर संतोष रोहोकले यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी अॅड. राहुल झावरे,सेवानिवृत्त प्राचार्य बबनराव भुजबळ, कारभारी पोटघन, विजुभाऊ औटी, रियाज पठाण, दादा शिंदे, अभयसिंह नांगरे, प्रा. डॉ.संतोष भुजबळ, संजय काळे, अनिल डेरे आदी यावेळी उपस्थित होते.