Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या वीस दिवसातच झाला प्रेमविवाहाचा शेवट !

0

 

ग्वाल्हेर : प्रेमविवाह झाल्यानंतर
अवघ्या वीस दिवसात एका नवविवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.संबंधित तरुणीने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
आत्महत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर,मृत मुलीच्या कुटुंबाच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा
दाखल केला आहे. संशयित आरोपी पती सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नेहा चौहान असे आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय नवविवाहित महिलेचे नाव आहे. तर राहुल बाथम असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव असून तो पटेल नगर हरगोविंदपुरम येथील रहिवासी आहे.
मृत नेहाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आरोपी राहुलशी ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर,अवघ्या काही दिवसांतच दोघांनी गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला होता. मृत मुलीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा विवाह केला होता. तिने आरोपी राहुलसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली
होती. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा भ्रम निरास झाला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.