Take a fresh look at your lifestyle.

रावणाची महती गाणारा समाज निर्माण होत आहे !

कलियुगाचं हे वैशिष्ट्य आहे.

नुकतच रावणावर प्रकाशित झालेलं एक भलंमोठं जाडजूड पुस्तक वाचायला मिळालं.रावणाला मोठं करण्याची एकही संधी लेखकाने सोडली नाही.श्रीरामांविषयी आयुष्यभर लिहीत राहीलं तरी ते अपुरे होईल असे असताना रावण या निच व्यक्तीरेखेविषयी भरभरून लिहण्याचा हव्यास का व्हावा?याचं कारण हे कलियुग आहे इतकच उत्तर ठिक आहे. 
कलियुगात खोट्याचा बोलबाला होईल आणि सत्य झाकोळलं जाईल अशी शास्रवाणी आहे. आणि आम्ही ते पदोपदी अनुभवतो आहोत.आपल्या भोवती काही नितीभ्रष्ट माणसं वावरत असतात,पण प्रतिष्ठित होतात हा प्रताप केवळ कलिचा आहे. (कदाचित आपणही त्यात असु शकतो.हे चिंतन एकांगी नाही.) असो विषय रावणाचा आहे.
रावणाचं उदात्तीकरण करताना त्याला अनेक सदगुणांनी सजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणे एका मुलीला विचारलं तुला भाऊ कसा पाहिजे?तेव्हा ती म्हणाली रावणासारखा.ज्याने बहिण शुर्पनखासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं.आता सत्य काय आहे ते लक्षात घ्या.राजा कालकेयचा सेनापती विद्युतजिव्हा हा शुर्पनखाचा नवरा म्हणजे रावणाचा मेव्हणा.रावण त्रिलोक विजय मिळवण्यासाठी निघाला तेव्हा त्याने अनेक राज्यांवर स्वाऱ्या केल्या आणि विजय मिळवला.त्याचे राजा कालकेयाशी युद्ध झाले त्यात विद्युतजिव्हा मारला गेला.स्वतःच्या बहिणीला त्याने विधवा केले.तेव्हा शुर्पनखाने रावणाला शाप दिला की तुझ्या नाशाचं कारण मी होईल.कुबेरपुत्र नलकुबेराने दिलेला शाप.रावणाने अप्सरा,रंभेसह अनेक स्रियांचे अपहरण केले.वेदवती रुपवान होती ती गरीब होती.तिच्या रुपावर मोहीम होऊन रावण तिला जबरदस्तीने डोक्याच्या केसांना धरून ओढत नेऊ लागला तेव्हा तिने आपले प्राण त्यागले.मरताना तिने शाप दिला की कोणत्याही स्रीच्या इच्छेविरुद्ध तु तिला स्पर्श करशील तर भस्म होशिल.या अनेक शापांनी त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.म्हणून तो नाविलाजाने तसं वागत होता.
सितामाईला त्याने हात लावला नाही याचं पुष्टीकरण केवळ मुर्खपणाचं आहे.
रावण त्रिलोक विजेता नव्हता.वानरराज बालीशी त्याने युद्ध केले तेव्हा काखोटीत रावणाचं मुंडक दाबुन रावणाला तडफत ठेवले होते,भगवान शंकरांना परास्त करण्यासाठी कैलासावर स्वारी केली.तेव्हा त्याने पर्वत उचलण्यासाठी तळाशी हात घातला.तेव्हा भगवान शंकराने त्याला अनेक वर्षे त्याच अवस्थेत बोंबलत ठेवले होते.दोनही प्रकरणात बापानं विनंती केली म्हणून रावण सुटला.माहिष्मतीचा राजा कार्तविर्य आणि अर्जुनाने देखील रावणाची दैना केली होती. रावण प्रकांडपंडीत होता,मातृभक्त होता हे जरी खरं असलं तरी ज्ञान विनयाखेरीज शोभत नाही. आपली हुषारी विनाशक असेल तर ती शुन्य आहे.अधुनिक रावणांविषयी पुढे विस्ताराने बोलू.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
रावणाची भलावण करणारा समाज निर्माण होणं हे विनाशाचं महाद्वार खोलण्या सारखं आहे. आम्हाला कळतय पण वळण्यासारखी परिस्थिती राहिली नाही हे अगदी खरं आहे. भ्रष्ट समाजव्यवस्थेत लाचारी,हुजरेगिरी करताना काहीच वाटत नाही हे कशाचं द्योतक आहे?त्यालाच आता सन्मानाची जागा मिळत आहे.
जय श्रीराम
रामकृष्णहरी